पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. 2 ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून ५ ऑगस्ट सकाळी ८ ऑगस्टपर्यत या घाटातून वाहतूक बंद करण्याचे निर्देश काढले आहेत. यंदा ताम्हिणी घाटात प्रचंड पाऊस झाला आहे. काही भागांत दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे घाट रस्ता बंदही करण्यात आला होता.
मुुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरातील आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफवरील रस्त्याच्या एका बाजूला तडा गेल्याने रस्ता खचला आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता शुक्रवारपासून (दि. २ ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून) येत्या सोमवारपर्यंत (दि. ५ ऑगस्ट सकाळी ८ ऑगस्टपर्यत) हा रस्ता बंद करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील आधारवाडी आणि डोंगरवाडी गाव येथे एक ऑगस्ट रोजी पुणे ताम्हिणी क्रमांक ७५३ वर साखळी क्रमांक ६१/६५० ते ६१/६८० मध्ये रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेली असून रस्ता पूर्णपणे खचला आहे हा घाट वनपरिक्षेत्रात असून पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे.
रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे आणि रस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरू असून आत्ता या महामार्गावरील वाहतूक एका बाजूने चालू ठेवलेली आहे. परंतु पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता अजून खचण्याची आणि अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या महामार्गावरील नियमित वाहतूक चालू ठेवणे धोकादायक आहे.
रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या ताम्हिणी घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक यजा करतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील आधारवाडी आणि डोंगरवाडी गाव येथील भागात खटलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी २ ऑगस्ट २०२४ पासून ५ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
#आदरवाडी व #डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचलेला आहे; नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता आजपासून ५ ऑगस्टपर्यंत सदरचा रस्ता बंद-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश#Pune
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 2, 2024
यंदाच्या पावसाळी हंगामात घाटमाथ्यावर जून महिन्यात वरुणराजाने ओढ दिली होती. पण, जुलै महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला एका दिवसात शंभर मिमी पावसाची नोंद व्हायची. आता गेल्या चार-पाच दिवसांमध्ये तर तीनशे ते पाचशे मिमी पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर वरुणराजा धो-धो बरसला आहे.

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group