Police bharti Raigad

रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या आज झालेल्या लेखी परीक्षेच्या वेळी झालेला गैरप्रकार रायगड पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६ उमेदवारांना ताब्यात घेण्यात आलंय.

कॉपी रोखण्यासाठी परीक्षार्थींच्या तपासणीसाठी हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. त्यातूनच हा प्रकार उघडकीस आला आहे. हे सर्व ६ जण पुरुष उमेदवार असून त्यातील ४ जण बीडमधील तर संभाजीनगर येथील एक तर जालना येथील एका उमेदवाराचा समावेश आहे. या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर डीव्हाइस वरून जे कुणी त्यांच्या संपर्कात होते त्यांचाही शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली.

रायगड पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या ३९१ जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया जुलै २०२४ महिन्यापासून सुरू आहे. कागदपत्र पडताळणी, शारीरिक क्षमता चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना आजच्या लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले होते. आज अलिबाग आणि पेण इथ ११ केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ४ हजार ७४७ उमेदवार बसले होते.

परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर व केंद्रा बाहेरील परिसरात १ पोलीस अधीक्षक, १ अपर पोलीस अधीक्षक, १०० पोलीस अधिकारी ५७६ अंमलदार असे एकुण ६७७ पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.