Anil Navgane

१९३ श्रीवर्धन मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांनी तळा तालुक्यात घरोघरी जाऊन मतदारांशी सुसंवाद साधला. आपल्या कार्याविषयी लढाई विषयी ते संवाद साधत आहेत.

मी माझ्या राजकीय कारकीर्दीत जनतेच्या हिताचीच कामे केली, पण येथील आमदार मंत्री महोदय खासदार यांनी बेरोजगारी स्थलांतर या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्याने येथील गावे ओस पडली आहेत रोजगार नसल्याने तरुण वर्ग हा छोटी मोठी नोकरी करण्यासाठी मुंबई आणि उपनगराकडे वळत आहेत.

गणेशोत्सव, होळी, दसरा असे पारंपारिक सण आले तरच हा तरुणवर्ग गावाकडे हजेरी लावतो एरवी सगळीकडे शांतताच-शांतता पसरलेली असते हे सर्व भयानक आहे, काही वर्षात ही गावे स्मशानागत बनायला वेळ लागणार नाही.
लोकप्रतिनिधींनी आपल्या कामातून जनतेपुढे आदर्श निर्माण करावा असे म्हणत अनिल नवगणे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे.


महाविकास आघाडी या मतदार संघाचे चित्र बदलणार असून त्यासाठी आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करून मला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन करीत आहेत. खा. सुनील तटकरे गेली ३५ वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत त्यांच्या कडून आम्हाला बऱ्याच अपेक्षा होत्या. केंद्रात असताना रोजगार निर्मिती, आंतरराष्ट्रीय व्यापार, उद्योग शिक्षण, कृषीला चालना तरुणांसाठी रोजगार निर्मिती देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे अशी महत्त्वाची कामांची जबाबदारी असते. पण यापैकी काही तरी चांगले काम करून येथील बेरोजगार, शेतकरी यांना न्याय देतील अशी आशा होती परंतु तसे काही झालेले दिसत नाही केवळ सामाजिक सभागृह, स्मशान शेड, अंतर्गत रस्ते ठोकळे ही विकासकामे पक्षाच्या कार्यकर्त्यांना

देऊन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न तटकरे कुटुंबांनी मार्गी लावला नसल्याची खरमरीत टीका अनिल नवगणे यांनी केली. या कार्यकर्त्यांकडून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत त्यामुळे नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे असा सल्ला त्यांनी यावेळी नवगणे यांना दिला. तळा तालुका हा नेहमी तटकरे कुटुंबाच्या मागे राहिला आहे परंतु यावेळी बहुजन समाज माझ्या बरोबर असून अदृश्य शक्तींचा देखील मलाच पाठिंबा असून हा तालुका या विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवेल आणि मला विधानसभेत पाठवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अनिल नवगणे यांनी प्रचारात जोर धरला असून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात कुणबी समाज बांधव अधिक प्रमाणात असून महागाव, बारपे, निगुडशेत, कासेखोल, चोर बली, तळेगाव, गिरणे, नानवली, तळा शहरातील वरचा मोहल्ला, मेट मोहल्ला या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संवाद साधत मतांची झोळी पुढे करीत आहेत.

Ad:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Anil Navgane