उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल व खालापूर या तिन्ही तालुक्यातील प्रचारात शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार युवा नेतृत्व प्रीतम जे एम म्हात्रे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण उरण मतदारसंघात प्रीतमदादा यांची निशाणी असलेल्या शिट्टीची हवा निर्माण झाली आहे. तर मतदारसंघातील जनतेला आता शिट्टीची हवा,प्रीतमदादाच आमदार हवा असे चित्र निर्माण झाले असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत उरण, पनवेल आणि खालापूर मधील मतदारांनी प्रीतमदादा म्हात्रे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. प्रचार संपायला अवघे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराला अधिक वेग आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन शिट्टी निशाणीचा प्रचार करीत आहेत. या प्रचाराला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अनेक तरुण शिट्टी गळ्यात अडकवून प्रीतमदादा यांचा प्रचार करीत आहेत. या प्रचाराला जेष्ठ नागरिक,महिला,आबाळ वृद्ध आणि तरुणही प्रीतमदादा म्हात्रे यांना आपला हक्का उमेदवार म्हणून भरघोस प्रतिसाद देत आहेत.
उरण मतदारसंघातील या वाढत्या प्रतिसादामुळे घरोघरी गावोगावी शिट्टीची हवा निर्माण झाली आहे. मागील चाळीस वर्षांपासून पनवेलचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष आणि इनामदार उद्योजग जे. एम. म्हात्रे यांचा विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल आणि खालापूर तालुक्यातील गावागावात सढळहस्ते मदत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात आवर्जून उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबाचा आनंद दुगुणीत केला आहे. तर दुःखात कुटुंबाचे सांत्वन केले आहे. कोणताही तामझाम न करता साधेपणाने जीवन जगत समाजात मिळून मिसळून समाजाचा एक घटक म्हणून कार्यरत असलेल्या तसेच येथील जनतेच्या प्रश्नावर झालेल्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणारे शेकाप नेते जे.एम.म्हात्रे यांचे चिरंजीव प्रितमदादा म्हात्रे यांनी त्यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार करीत उरण विधानसभा निवडणुक लढवीत आहेत.
प्रीतमदादा यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यात भरीव कार्य केले आहे. तसेच मागील पाचवर्ष पनवेल महानगरपालिकेचे लढाऊ आणि कार्यकुशल विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. प्रीतमदादा यांना आपल्या या भूमीत भूमिपुत्र,स्थानिक आणि सर्व नागरिकांना आपल्या हक्काच मिळावं यासाठी उरण विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन तालुका चिटणीस विकास नाईक यांनी मतदारांना केले आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group