दि २०(विठ्ठल ममताबादे) यशश्री शिंदे कांडा मधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फड न.5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे.

लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून सदरची घटना उरण मोरा येथील फड न.5 मोहन स्टोर,सिंडीकेट बँकेच्या जवळील डोंगरावर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात घडली आहे. या कामी मुलीच्या आईने मोर सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत तिने म्हटले आहे.माझे पती,दोन मुलगे अनुक्रमे 10 व 9 वर्षाची दोन मुले 3 वर्षाची मुलगी व सासरे असा परिवार एकत्रितपणे राहतो. 13 जानेवारीस मी मुलीला शेजारच्या आंगणवाडीत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोडली व दुपारी 1 वाजता न तिला घरी आणली असल्याचे तिने आपल्या फिर्यादी मध्ये नोदविले आहे.

त्यानंतर आई घरातील आई कपडे धुण्यास घरात गेली परंतु मुलगी अंगणात खेळण्यासाठी जाण्या करिता रडू लागली ती बाहेर जाऊ नये म्हणून दाराला प्लॅयउड लाऊन अडकून ठेवले मुलगी जोरजोरात का रडते त्यामुळे त्यांचा शेजारी राहणारा दिनेश नितेकर(50)हा तेथे आला व मुलगी रडण्याचे कारण त्यांनी विचारले व मुलीला त्यांनी खेळण्या साठी अंगणात सोडले की वेळात आई काम आटोपून आली अंगणात मुलगी दिसत नाही पाहून तिने दिनेश नितेकर याल मुली संदर्भात विचारण केली असता मुलगी गल्लीत खेळत असल्याचे त्यांनी सांगितले आईने गल्लीत शोध घेतला परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश नितेकर यास पुन्हा विचारणा केली असता मुलगी संडासाच्या दरवाज्याजवळ असल्याचे तो म्हणाला.

आई मुलीला आणण्यासाठी गेली असता मुलगी घाबरून आईला बिलगून जोरजोरात रडू लागली आईने उचलून तिला घरी आणले, तिला ताप भरला म्हणून उरण मधील अभिनव चाईल्ड केअर क्लिनिक मध्ये नेले असता तेथी डॉ.अजय कोळी यानी तापावर औषध देऊन घरी जाण्यास सांगितले परंतु तीन दिवसा नंतरही ताप उतरला नाही आणि मुलीने दिनेश काकाने शूच्या जागी हात लावल्याचे सांगितले, त्यामुळे मुलीला उरणमघील गाडे हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉ.प्रीती गाडे यांनी तिची पूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचे लेखी पत्रच दिले त्यानंतर आईच्या पाया खालची वाळू सरकली.

तिने थेट मोर सागरी पोलीस ठाणे गाठून या बाबत दिनेश निवेतकर यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली.आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या अनुषगाने मोरा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता2023 कलाम 62(2),बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण आधी नियम 2012 कलम-4 बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण आधी नियम 2012 कलम-6 प्रमाणे गुंन्हादाखल करण्यात अला आहे या संदर्भात मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.