विद्यार्थी, पालक, शेतकरी यांना दाखल्याची आवश्यकता असते परंतु बऱ्याचदा असे होते कि सारख्या खेपा घालूनसुद्धा तलाठी कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे जनतेकडून विविध प्रकारच्या तक्रारी व सूचना शासनाकडे प्राप्त होत आहेत.
जनतेच्या सेवा वेळेत तलाठी उपलब्ध होण्यासाठी खालील सूचनांचे पालन करण्याच्या सूचना शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. सूचना पुढीलप्रमाणे:
- संबंधित तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा किंवा बैठका याबाबत कार्यालयाच्या आवारात सूचना फलक लावावा.
- संबंधित तलाठ्यांनी कार्यालयाच्या आवारात जनतेला समजण्यासाठी तलाठ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असतात यासंदर्भात फलक लावावेत.
- तलाठ्यांनी स्वतःचा दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक ठळक अक्षरात दिसेल असा कार्यालयाच्या आवारात लावावा तसेच संबंधित मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांचे नाव व संपर्क दर्शविण्यात यावेत.
- ज्या सज्जांच्या ठिकाणी तलाठी /मंडळ अधिकारी यांना शासनाने निवास्थान उपलब्ध करून दिली आहेत त्यांनी त्या निवासस्थानातच राहावे.
- सेवाहमी कायद्या अंतर्गत नमूद सेवा विषयक (विविध प्रकारचे उतारे मिळण्यासाठी लागणारा कालावधी) या संदर्भातील माहिती कार्यालयाच्या आवारात लावावीत.
- संबंधित तलाठी यांनी शेतजमिनी, पीकपहाणी करताना शेतजमिनीस भेटीबाबतचा तपशील जाहीर करावा.
- तलाठी कार्यालयामध्ये खाजगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाजाकरिता ठेवू नये. असे करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
- विविध दाखले देताना शासनाने आकारलेले वाजवी शुल्क याबाबतची दूरसुची कार्यालयाच्या आवारात लावावी.
या प्रकारचे नियम सर्व तलाठ्यांनी पाळणे आवश्यक आहे. समजा आपण जनतेला तलाठी नेमणूक किंवा त्यांच्या कार्यालयात हजर असण्यासंबंधी तक्रार असल्यास फोटोसहित आपण आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना ईमेलवरती पाठवू शकता. उदाहरणार्थ, [email protected]
