आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
पोलादपूर – संदिप जाबडे: ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी प्रमाणे शिक्षण ही काळाची गरज आहे. हेच शिक्षण घेत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थांना काही वेळेस आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने, शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते. या गोष्टीची जाणीव ठेवीत व सामाजिक बांधिलकी जपत श्री काळभैरवनाथ फाऊंडेशन पुणे यांच्यामार्फत पोलादपूर तालुक्यातील ४८ तर महाड तालुक्यातील ९ विद्यार्थांना दत्तक घेण्यात आले.
या विद्यार्थ्यांच्या १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च आम्ही करणार असल्याचे संस्थेचे आधारस्तंभ संतोष मेढेकर यांनी सांगितले. दत्तक घेतलेल्या पोलादपूर तालुक्यातील ४८ विद्यार्थ्यांमध्ये २६ विद्यार्थी हे विद्यामंदिर पोलादपूर शाळेतील तर २२ विद्यार्थी हे रा. जि. प. शाळा भोगाव हा शाळेचे आहेत.
या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तर, वह्या, कंपास, पेन, पेन्सिल, छत्री वाटप करण्यात आले.
दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ५ वी चे १०, ६ वी चे ०८, ७ वी चे १०, ८ वी चे ११, ९ वी चे ०५ तर इयत्ता १० वी च्या ०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाड तालुक्यातील फौजी आंबवडे बौद्धवाडीतील ०९ विद्यार्थ्यांना देखील दत्तक घेण्यात आले.

सदरील कार्यक्रमाला श्री काळभैरवनाथ फाऊंडेशनचे आधारस्तंभ उद्योजक संतोष मेढेकर, शाळेचे चेअरमन निवास शेठ, संस्थापक विजय शिर्के, अध्यक्ष राजाभाऊ कदम, विकास शिंदे, खजिनदार अजय कदम ,सचिव संतोष कदम,कार्याध्यक्ष अनंत जाधव, अजित कदम, सुजय प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सुरेशजी सकपाळ, पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे सचिव सचिन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते सिताराम भडाळे, विद्यामंदिर हायस्कूलचे प्राचार्य श्री जाधव सर, विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. श्री भैरवनाथ फाऊंडेशन पुणे या संस्थेने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अशीही केली मदत
भोगाव खुर्द गावातील घराच्या कौलावरून पडून मृत्युमुखी पडलेल्या कै. सूर्यकांत चिकणे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
