sunil tatkare and nitin gadkari


मुंबई – गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा आता काँक्रीटचा होणार असून यासाठी ₹७५० कोटींचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. कासु ते इंदापूर या काँक्रीट मार्गाच्या कामाचे भूमिपूजन आणि दिघी ते माणगाव, इंदापूर ते आगरदांडा या राष्ट्रीय महामार्गाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते ३ एप्रिल २०२२ रोजी इंदापूर येथे संपन्न होणार आहे.



मुंबई – गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरच्या डांबरी रस्त्याची अतिवृष्टी व अवजड वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. याच अनुषंगाने, केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याशी पळस्पे ते इंदापूर या रस्त्याचे काँक्रीटकरण करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार नितीन गडकरी यांनी अखेर या रस्त्याच्या कामासाठी मान्यता दिली आहे. पळस्पे ते कासु आणि पुढे कासु ते इंदापूर अशा दोन टप्प्यात या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार आहे.



याबरोबरच, प्रस्तावित रेवस रेड्डी सागरी महामार्गाला राष्ट्रीय दर्जा दिला असला तरी या मार्गाला अद्याप नंबर देण्यात आलेला नाही. तो देण्यासाठी आणि वडखळ ते अलिबाग या राष्ट्रीय मार्गालाही मंजुरी देण्याबाबतची मागणी खासदार सुनील तटकरे श्री.नितिन गडकरी यांच्याकडे करणार आहेत. तसेच कशेडी घाटातील बोगद्याच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात यावी यासाठी सुद्धा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे ते पाठपुरावा करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.