irshalwadi Raigad Landslide

मंदिरात गेम खेळत बसलेली मुलं ठरली देवदूत; त्याच मोबाईलवरुन मागितली मदत.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याच्या घटनेत आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. साधारण 50 ते 60 घरं असलेल्या या गावात अंदाजे २४०-२५० लोकं राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अजून साधारण 100 ते 125 लोकं अडकले असल्याचं सांगितलं जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर जखमींवर आधी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं जात आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिली.



दरम्यान, आजूबाजूच्या गावातील आणि स्थानिक युवकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:४५ दरम्यान ही घटना घडली. गावातील मंदिरात गेम खेळत बसलेल्या 5 मुलांकडून याबाबतची माहिती समजली. त्यांनीच मोबाईलवरुन प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर साडे बारापर्यंत हे युवक घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय पोलीस, रुग्णवाहिका आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या युवकांनी वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीची वेळ असल्याने पोलीस युवकांना वरती सोडतच नव्हते.



फोन केल्यानंतर रातोरात शासनही घटनास्थळी दाखल झाले. युवकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच रातोरात शासनही घटनास्थळी दाखल झाले. एक ते दीड वाजण्याच्या सुमारास स्थानिक आमदार महेश बालदी कार्यकर्त्यांना घेऊन तिथं आले. त्यांच्यासोबत युवकांनी मध्यरात्रीच ट्रेक सुरु केला. त्यानंतर मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहचले.



प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितल्याप्रमाणे ‘बुधवारी रात्री मोठा पाऊस सुरू होता. वाराही सुटला होता. आम्ही घरातच होतो. अचानक बाहेर काहीतरी मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं की एखादं घरच पडलं आहे. पण, बाहेर येऊन पाहिलं तर अख्खं गावच ढिगाऱ्याखाली दबलं गेलं होतं. आमच्या शेजारील काही घरेही दबली गेली होती. त्यानंतर आम्ही आरडाओरडा करू लागलो. घरातील सदस्यांना घेऊन पटकन बाहेर पडलो.’

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह आढळले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः पोहोचले आहेत. ज्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या तेथे मंत्री गिरीश महाजन आणि आ. महेश बालदी हे मध्यरात्रीच पोहोचले. ते दोघेही स्वतः मदत कार्यात आहेत. पाऊस आणि हवामानामुळे मदत कार्यात अडचणी असल्या त्यातून मार्ग काढला जात आहे. गेल्या 3 दिवसात सुमारे 499 मिमी पाऊस येथे झाला आहे. एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत.



तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून 500 कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत. राज्य नियंत्रण कक्ष सातत्याने स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहे. दोन ‘अर्थ मुव्हींग मशिन’ तेथे एअरलिफ्ट करता येतात का, याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही फोनवर संपूर्ण घटनेची माहिती घेतली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.