khalapur khopoli

तालुक्यातील इरशाळवाडी येथील दुर्घटनेत अडकलेल्या लोकांचे बचावकार्य करताना नवी मुंबई, बेलापूर येथील अग्निशमन अधिकारी यांचा रेस्क्यू करताना मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. . यामध्ये 100 हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आत्तापर्यंत 84 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश व 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू



या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व मदत व बचावकार्याचा आढावा घेतला.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.



बुधवारी रात्री मोरबे डॅम जवळ असलेल्या इर्शाळगडाचा भाग खचल्याने त्यावरील इर्शाळवाडी ही वस्ती जमीनदोस्त झाली.सदर ठिकाणी रात्री रेस्क्यूचे काम करीत असताना अग्निशमनचे सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.



या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.