रोह्यात नुकताच कुंडलिका नदीपात्रात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा हिमेश नारायण ठाकूर, रा. लक्ष्मीखार-रोहा (17) याला बंधार्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना घडली. हिमेश आपल्या नऊ मित्रांसह खांबेरे हद्दीतील बोबडघर आदिवासी वाडीजवळील बंधार्यात पोहायला उतरला असता, त्याचा पाय घसरल्यामुळे तो तरुण बुडाल्याची घटना घडली. दुसर्या दिवशी सकाळी स्थानिक व रेस्क्यू टीम यांच्या मदतीने त्याचा मृतदेह सापडल्याचे प्रशासन सांगितले. या घटनेमुळे रोहा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या पाऊस जोरदार सुरू आहे. अनेक नद्या, नाले हे ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण जिवाची पर्वा न करता पाण्यात आनंद घेण्यासाठी जात असतात; परंतु हा आनंद अनेकांच्या जीवावर बेतू शकतो, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, हिमेश हा तरुण आपल्या मित्रांसोबत मुंबई येथील खारदांडा येथून खांबेरे येथील बोबडघर आदिवासी वाडीजवळील बंधार्यात गेला होता. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी तरुण पाण्यात उतरला असता त्याचा पाय घसरल्यामुळे तो तरुण पाण्यात बुडाला.
रोहा पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, सह्याद्री वन जीवन रेस्क्यू टीम तसेच स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. दुसर्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह सापडल्याचे नायब तहसीलदार राजेश थोरे यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्याने तेथे कोणी पोहण्यास जाऊ नये, असे खांबेरे सरपंच अतिश मोरे यांनी आवाहन केले आहे.
या बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी रोहा तहसीलदार किशोर देशमुख, नायब तहसीलदार राजेश थोरे, तलाठी विशाल चोरगे, तेजस्वी मोरे तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली. सह्याद्री वनजीवन रेस्क्यू टीम तसेच स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी शोधकार्य सुरु करण्यात आले. आज 3 ऑगस्ट सकाळी त्याचा मृतदेह सापडल्याने शोधकार्य थांबविण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार राजेश थोरे यांनी दिली.
Cannot collect videos from this channel. Please make sure this is a valid channel ID.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
