मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते वडपाले या २६.७ किमीच्या चौपदरीकरणाच्या कामात कमकुवत दर्जाच्या कामामुळे अनेक अपघात झाले असून, यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. या प्रकरणात चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोन ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षांनंतर अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
माणगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेशकुमार सिंह, आणि प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कावळे यांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा केला होता आणि महामार्गावरील अपघातांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांत महामार्गाच्या कामातील हलगर्जीपणामुळे १७० अपघात झाले असून, त्यात ९७ लोकांचे मृत्यू झाले आहेत. तसेच २०८ प्रवाशांना गंभीर किंवा किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या परिस्थितीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
२०१७ पासून सुरू असलेले काम अद्यापही अपूर्णच आहे. रायगड हद्दीतील इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतरातील महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम १ जून २०१७ रोजी मंजूर झाले होते आणि १८ डिसेंबर २०१७ पासून कामाला सुरुवात झाली होती. करारानुसार हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण मुदत संपूनही काम अद्याप अपूर्ण आहे. शासनाने मुदत वाढ दिली असली तरीही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group