Mahad MNS ST bus depot

महाड एसटी स्थानकाची झालेली दूरवस्था तसेच आगाराचे सतत दुर्लक्ष होत असल्याने आणि रखडलेल्या नवीन बस स्थानकाच्या विषयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बसस्थानकात “गुरे बांधा” आंदोलन करण्यात आले. मनेसेचे हे अनाखे आंदोलन महाडमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

महाड एसटी आगाराची बर्‍याच वर्षांपासून दयनीय अवस्था आहे. नियोजित नवीन बसस्थानक निधीअभावी रखडलेले आहे. जुन्या बस स्थानकातील रस्त्यावर सतत चिखल होत असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. महिला व पुरुष प्रसाधनगृह गेले कित्येक वर्ष दुर्गंधीयुक्त, घाणेरड्या अवस्थेत असल्याने महिलांची प्रचंड गैरसोय होत आहे.

अशा अनेक समस्यांवरुन मनसेतर्फे हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सरकारचा व एसटी प्रशासनाचा निषेध नोंदवून बस स्थानकात त्यांनी गुरे बांधली आणि अधिकार्‍यांना जाब विचारला.

यावेळी पक्षातर्फे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर, वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष फैसल पोपेरे, शेखर सावंत, चे ण सुखदरे, अध्यक्ष स्वप्निल वडके, पंकज उमासरे, सागर भोसले, महिला आघाडी शहर अध्यक्ष प्रतीक्षा कुलकर्णी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अथर्व देशमुख, भरत गंगथडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनावेळी उपस्थित होते.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.