मोठ्याप्रमाणावर धुके होते. त्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर (Helicopter Crash) इंजिनाने लगेच पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. त्यामुळे आतमध्ये असणारे वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला

अजित पवार गटाचे नेते व खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच हा अपघात घडला.

सुनील तटकरे यांचा काल या हेलिकॉप्टरनेच पुण्याहून परळीला प्रवास.

परळीला जाऊन पुन्हा तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते. आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

ऑगस्टा 109 असे या हेलिकॉप्टरचे नाव असलेल्या वैमानिकांची ओळख पटली आहे. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वार दिले जाणार होते, अशीही माहिती आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.